
ज्ञान , विज्ञान आणि सुसंस्कार” हीच खरी जीवनाची त्रिसूत्री – डॉ.शैलजा साळुंखे
तासगाव, ता.२(प्रतिनिधी) शिक्षणमहर्षी डॉ.बापुजींनी सांगितलेली ज्ञान , विज्ञान आणि सुसंस्कार” ही जीवनाची त्रिसूत्री विद्यार्थीनीनी जीवनात आत्मसात करावी असे प्रतिपादन डॉ.शैलजा साळुंखे यांनी केले. येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात पदोन्नती आणि काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.…