तासगाव, दि.10 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथील भूगोलशास्त्र विभागातील प्रा.विशाल रंगराव पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळाली. त्यांनी “इम्पॅक्ट ऑफ ड्रॉट प्रोण कंडिशन ऑन एग्रीकल्चर इन सांगली डिस्ट्रिक्ट” या विषयावर शोधनिबंध सादर केला. सांगली जिल्हयातील शेतीवर दुष्कळाचा होणारा परिणाम यावर त्यांनी संशोधन केले, त्यांना एलफिस्टन कॉलेज मुंबई चे डॉ.रतन हजारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांना श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, प्राचार्य एस.एम.गवळी, आजीव सेवक व सांगली जिल्हा विभागप्रमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार व प्राध्यापक मित्रपरिवार, वडील श्री. रंगराव पाटील, आई सौ. भारती पाटील, पत्नी डॉ.अनिता पाटील व सर्व परिवाराचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले.
