तासगाव, दि.14 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अग अग म्हशी…..आणि पाण्यात बशी….., धबाली म्हैस…. आणि पाण्यात बैस….. या आपल्या मराठी भाषेतील गावरान म्हणी आहेत. याचाच अर्थ म्हैशीला पाण्याची ओढ जरा जास्तच असते. उन्हाळ्यात तर म्हैशील पाण्यात मनसोक्त डुंबायला खूपच आवडते. पण काल तासगाव तालुक्यात जरा वेगळीच घटना घडली. वाट चुकलेल्या एका जंगली गवा रेड्याने चक्क शेततळ्यात मनसोक्त स्विमिंग केले. हार्दिक प्रकार पाहून लोकांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली. गेली चार -पाच दिवस एका जंगली गव्याचे तासगाव तालुक्यातील सावळज परिसरात लोकांना दर्शन झाले. गवा रेडा द्राक्षाच्या बागेतून जात असतानाचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडिया वरून व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सावळज, कवठेमहांकाळ, डोंगरसोनी, या परिसरातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते. वनविभागाकडून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अशातच डोंगरसोनी येथील डोंगरसोनी ते तिसंगी रस्त्यावरील लोहार मळ्यात मोहन झांबरे यांच्या शेततळ्यात दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे ताहीली झालेल्या एका गवा रेड्याने चक्क शेतळ्यात डुबकी घेऊन मनसोक्त स्विमिंग केले. मन भरून पोहून झाल्यानंतर गवा रेडा ऐटीत शेततळ्याच्या बाहेर येऊन निघून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार पाहून उपस्थित नागरिकांची मात्र घाबरगुंडी उडाली आहे.

