३२ शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन प्रीमियम लीग २०२३ साई दत्त क्रिकेट वॉरियर्स विजेता

शिराळा, दि.१५ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा, नथुराम कुंभार) नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर १६ येथील श्री रामलीला मैदानावर ३२ शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ३२ शिराळा प्रीमियम क्रिकेट लीग २०२३ च्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मेंनी रांजणवाडी येथील मुंबई स्थित साई दत्त परिवाराचे अध्यक्ष उद्योगपती सुरेशभाऊ रांजवण यांचा साई दत्त क्रिकेट वॉरियर्स संघ विजेते झाले आहेत. स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे ३२ शिराळा प्रीमियर लीग २०२३ चा विजेता संघ साईदत्त वारीयर्स टीम मालक सुरेशभाऊ रांजवण व सुनील रांजवण, उपविजेता संघ सरकार 11 संघ मालक नंदू डफळे, तृतीय नंबरचा विजेता संघ अरुण मोहिते संघ मालक अरुण मोहिते. रांजवण पुढे म्हणाले की, नवी मुंबई च्या नेरूळ मधील सेक्टर सारसोळे येथील श्री रामलीला मैदानावर या क्रिकेट स्पर्धेचा थरार आयोजित करण्यात आलेला होता. त्यामध्ये बारा संघमालक यांचे बारा संघ, १८० खेळाडू सहभागी होणार आहेत या १२ संघामध्ये क्रिकेट झाले होते. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख द्वितीय क्रमांक ७५ हजार तृतीय क्रमांक ५१ हजार चतुर्थ क्रमांक ३१ हजार अशी बक्षिसे शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती सम्राटसिंह नाईक भैया, युवक नेते नगरसेवक पृथ्वीसिंग नाईक बाबा, उद्योगपती शंकर दादा मोहिते,यांनी प्रायोजित केली होती. याबरोबरच खेळाडूंना सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदी पुरस्काराने सन्मानित केले गेले. ३२ शिराळा असोसिएशनचे बबलू पाटील,विशाल नायकवडी,सचिन चव्हाण, यांचे नियोजन उत्कृष्ट झाले. यावेळी या क्रिकेट स्पर्धेसाठी यशवंत कंधारे आप्पा, विकास पाटील, वसंत भाडुगळे, विजय पाटील, संदीप खांडेकर राजू मोरे अमोल देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. साई दत्त वॉरिअसचे आयकॉन प्लेयर निखिल आस्कट चॉईस प्लेयर राजू पवार संघनायक अजित चिंचोलकर मिथुन मस्कर अमोल पवार सचिन माने विजय यादव राजू पाटील पप्पू किरण अमर राहुल अर्जुन यश टीम व्यवस्थापक हनमंत रांजवण गणेश बेंगडे आनंद बेंगडे आदी मान्यवर खेळाडू यांचे या स्पर्धेला मोलाचे सहकार्य लाभले आहे.