राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल : शरद लाड

देवराष्ट्रे येथील युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

देवराष्ट्रे दि.१५ ( महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सोनहिरा परिसरातील नवीन पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून ताकद देण्याचे काम इथून पुढल्या काळात केले जाईल. राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे प्रतिपादन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद लाड यांनी केले. देवराष्ट्रे (ता. कडेगाव ) येथील युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. देवराष्ट्रेतील न्यू धडकन ग्रुपचे अध्यक्ष सचिन मिसाळ ,अभिजीत मोरे, भगवान मिसाळ, मारुती सकटे, विक्रम मोरे, अंकुश मिसाळ, तुकाराम मिसाळ, शामराव मिसाळ, गणेश वायदंडे, स्वप्निल मोरे, भगवान मिसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना शरद लाड म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाकडे लोकांचा कल वाढत आहे. देवराष्ट्रेतील पक्षप्रवेशामुळे सोनहिरा खोऱ्यात राष्ट्रवादी अधिक मजबूत होण्यास मदत होईल. यावेळी विटा बाजार समितीचे माजी संचालक धोंडीराम महिंद, गणेश शिरतोडे, जालिंदर गवाळे, संदीप मोहिते, बापूसो मदने, शंकर मस्के, सागर महिंद, शौकत मुल्ला यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.