19 मार्चला सांगलीत देशस्थ सोनार समाजाचा वधुवर मेळावा

सांगली, दि.16 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) देशस्थ सोनार समाज संघ, सांगली यांच्यावतीने रविवार दिनांक १९ मार्च रोजी राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे. सांगली येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, यासह महाराष्ट्र राज्यातील व कर्नाटक राज्यातील सोनार समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आदिसागर मंगल कार्यालय, कोल्हापूर रोड, अंकली येथे ठीक 10:00 वाजता मेळाव्याचे उद्घाटन आणि प्रतिमापूजन, तसेच वधू-वर परिचय होईल. दु. 12 वा. स्नेहभोजन व आभार प्रदर्शन असा कार्यक्रम होणार आहे. तरी, या राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्यासाठी सर्व देशस्थ सोनार समाज बांधव, बंधू – भगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष संतोष पंडित, उपाध्यक्ष रामकृष्ण पोतदार यांनी केले आहे. हा राज्यस्तरीय मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व सोनार समाज बांधव प्रयत्न करीत आहेत. अधिक माहितीसाठी ८६६८९२०१९१, ८६९८७५५५५१ नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन सोनार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.