तासगाव, दि.24 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यात विविध विकासकामांसाठी खासदार संजय काकांच्या माध्यमातून निधी आणायचा आम्ही व आम्ही निधी आणला अशी विना तारखांची पत्र टाकून फुकट श्रेय घ्यायचं तुम्ही, असा फुकट श्रेय घेण्याचा बाल हट्ट रोहित पाटील यांनी सोडावा असा हल्ला भाजप युवक नेते प्रभाकर पाटील यांनी राष्ट्रवादीचे युवक नेते रोहित पाटील यांच्यावर केला. यावेळी बोलताना युवक नेते प्रभाकर पाटील म्हणाले की तासगाव पंचायत समिती नवीन बांधकामासाठी 25 जुलै 2022 रोजी त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली अशी बातमी आली. यानंतर 10 ऑगस्ट 2022 ला काही तांत्रिक कारणामुळे याला स्थगिती मिळाल्याचे पत्र आले. मात्र प्रशासकीय इमारतीस मान्यता मिळाल्याचा जीआर व त्याची बातमी रोहित पाटील यांनी समाज माध्यमात देत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या कामास स्थगिती मिळाल्याचा माहिती त्यांनी सोशल मीडियात व मतदार संघाला दिली नाही. यानंतर पंचायत समिती इमारतीसाठी 23 जानेवारी 2023 रोजी खासदार संजय काका पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करून तासगाव पंचायत समिती इमारत बांधकामासाठी 17 कोटींची मागणी केली. यामध्ये फर्निचर सह कर्मचाऱ्यांसाठी निवासिकेची ही मागणी करण्यात आली. 21 मार्च 2023 ला यावरील स्थगिती उठवण्याचा जीआर निघाला. यानंतर आमदार पुत्रांनी पुन्हा श्रेयवाद सुरू करत फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला. तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय तुम्ही घ्या मात्र दुसऱ्यांनीही कामाचे केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा बालहट्ट तुम्ही सोडा असे त्यांनी सांगितले. या कामास मान्यता मिळाल्यानंतर सोशल मीडियात हे काम आम्हीच केले हे सांगितले जात आहे. तासगाव कवठेमहंकाळसाठी प्रांत कार्यालय मंजूर झाल्याचे सांगत आमदारपुत्रानी सोशल मीडियात जाहिरात बाजी सुरू केली. प्रांत कार्यालय जर मंजूर झाले असेल तर आमदारांनी विधानसभेत प्रांत कार्यालयाची मागणी का केली याच उत्तर त्यांनी दयावे असे पाटील म्हणाले. विविध योजनांचा खासदार संजय काकांच्या माध्यमातून आणलेला निधी हा आम्हीच आणला असे सांगत त्याच्यावरून श्रेयवाद केला जात आहे. यामध्ये प्रांत कार्यालयाचा ही समावेश असल्याचे प्रभाकर पाटील यांनी सांगितले.
