पी.डी.व्ही.पी. महाविद्यालयात म.ज्योतिराव फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रम
तासगाव, दि.19 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) समाजातील प्रश्नांसाठी तरुणांनी सजग असावे. सामाजिक प्रश्नांची जाण युवा पिढीला हवी असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे इतिहास विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले. क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालय विविध उपक्रम राबविण्यात आले. इतिहास विभागाच्या वतीने समाजातील ज्वलंत समस्यावर आधारित पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन केले.प्राचार्य पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन समाजातील विविध प्रश्न शोधून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.परीक्षक म्हणून डॉ. विनोदकुमार कुंभार , डॉ.बी.जे.कदम यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. पल्लवी मिरजकर यांनी केले. आभार कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.रणजीत कुंभार यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए.यादव, प्रा. संदिप पाटील यांसह विविध विभागाचे विभागप्रमुख , प्राध्यापक , विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
