आण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला लाभलेलं अनमोल रत्न – प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे

पी.डी.व्ही.पी. महाविद्यालयात लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

तासगाव, मंगळवार दि.1 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) ‘जग बदल घालुनी घाव, मला सांगून गेले भीमराव’ या क्रांतीगीतातून आणि आपल्या साहित्यातून महाराष्ट्रावर आधिराज्य करणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला मिळालेलं अनमोल रत्न आहे असे उदगार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी काढले. येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलतहोते. डॉ. हुजरे म्हणाले, तमाशा या कला प्रकाराला मान व प्रतिष्ठान मिळवून देण्याचे काम आण्णाभाऊ साठे यांनी केले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांनी जहाल गटाचे नेतृत्व करत इंग्रजांना जेरीस आणले. यावेळी ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा.एस.डी.पाटील, राणी चव्हाण, श्रावणी संकपाळ, श्रेया फाळके, तनुजा माळी, प्राची पाटील या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून महापुरुषांच्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक प्रा.सौ.एस.बी.पाटील यांनी केले तर आभार प्रा.डी.एच.पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला कार्यक्रम कमिटी प्रमुख डॉ.एस.आर घोगरे, अधिक्षक एम.बी. कदम यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवकवर्ग विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.