बस्तवडे येथे बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन

तासगाव, बुधवार दि.23 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील माळी वस्ती येथे जरंडी येथील एका शेतकऱ्यांने बिबट्या सदृश्य प्राणी पहिल्याने एकच खळबळ उडाली. या परिसरात बिबट्या सदृश्य 2 प्राणी पहिल्याचे लोक सांगत आहेत. त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. तासगाव वन विभागाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली. परिसरात ऊस शेतात पायाचे ठसे तपासून खात्री केली. लोकांनी भीती बाळगण्याचे कोणतेच कारण नाही. मात्र खबरदारी घेण्याचे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.