तासगावच्या अमृतेश्वर नगरची शाळा बनली ‘हॅपी स्कुल’

इनरव्हील क्लबचा ऑफ तासगाव चा उपक्रम

बुधवार,दिनांक – 24 सप्टेंबर 2025 तासगाव (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव शहरातील दत्तमाळ येथील अमृतेश्वर नगर मधील महात्मा ज्योतिबा फुले विद्यामंदिर या नगरपरिषद शाळेस ‘हॅपी स्कूल’ बनविण्यासाठी इनरव्हील क्लब तर्फे शाळेला क्रीडा साहित्य, वाचनालयासाठी पुस्तके, हात धुण्यासाठी वॉश बेसिन, शाळेची रंगरंगोटी, चप्पल स्टॅन्ड, ग्रंथालयासाठी कपाट, शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर, पोषन आहाराचे धान्य ठेवण्यासाठी दोन डबे, सॅनेटरी किटचे वाटप करण्यात आले. तसेच, स्वच्छतागृहाची दुरुस्ती, तसेच, खिडक्यांच्या फुटलेल्या काचा बसवून देण्यात आल्या. प्रसंगी, शाळेतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी, पीडीसी नंदा झाडबुके यांनी आपल्या मनोगतातून या शाळेला ‘हॅपी स्कुल’ म्हणून घोषित करत शाळेबद्दल भावना व्यक्त केल्या. यावेळी, स्वागत मुख्याध्यापक दगडू शेंडगे यांनी तर, सूत्रसंचालन इनरव्हील क्लबच्या चार्टर मेंबर योगिनी नाईक यांनी केले. प्रसंगी, क्लबच्या अध्यक्षा रूपाली मिरजकर, सचिव रिद्धी नाईक, सदस्या वंदना घनेरे, प्रमोदिनी विटेकर, प्रिया जाधव, शैलजा पवार, उज्वला पेटकर, वंदना पाटील, विनया पाटील, मीनाक्षी जाधव उपस्थित होत्या. उपक्रमाचे आभार सीपीसीसी स्मिता औताडे यांनी आभार व्यक्त केले. शाळेस शालेय, क्रीडा साहित्य दिल्या बद्दल इनरव्हील क्लबचे आभार नागेशराजे महाडिक यांनी व्यक्त केले. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ तासगाव यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार इनरव्हील क्लबच्या डीपीसीसी नंदा झाडबुके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेवून नगरपरिषद शाळेतील शिक्षक प्रतापसिंग गावित, संजय हजारे, मसूद पटेल, सुनीता पाटील, कल्याणी काळे, भागवत कोळेकर, मनीषा जाधव, शारदा उघडे, सुवर्णा लुगडे यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसंगी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रुपाली मिरजकर, सचिव रिद्धी नाईक, सीपीसीसी स्मिता औताडे आदी सदस्या व पदाधिकारी उपस्थित होते.