बुधवारी 1 ऑक्टॉबर रोजी तासगाव तहसीलदार कार्यालयासमोर करणार एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
सोमवार दिनांक – 29 सप्टेंबर 2025, तासगाव (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) यंदाच्या मान्सून हंगामात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी झालेल्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा यासह इतर मागण्यासाठी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेचे आमदार रोहित पाटील बुधवार दि.1 ऑक्टॉबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. तासगाव येथील तहसीलदार कार्यालयासमोर सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत हे आंदोलन होणार आहे. या मध्ये अतिवृष्टी झालेल्या संपूर्ण भागात सरसकट पंचनामे करण्यात यावेत, नुकसान ग्रस्त सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, नुकसान भरपाईची अनुदान रक्कम वाढवून मिळावी, शेतकरी बांधवांची सर्व कर्जाची बँक वसुली, तसेच शैक्षणिक व महसुली कर वसुली थांबवावी, सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या सर्व निराधार पेन्शनची रक्कम त्वरित मिळावी, शासनाने थांबवलेली रोजगार हमी योजनेची कामे पूर्ववत सुरु करावीत. आदी मागण्यांचा समावेश आहे.
