तासगावात कार्यकर्ता संवाद मेळावा तुफान गर्दीमध्ये संपन्न
तासगाव, बुधवार दिनांक – 8 ऑक्टॉबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कार्यकर्ते आणि सहकारी यांच्या प्रेमामुळेच विविध पदावरती काम करण्याची संधी मला प्राप्त झाली परमेश्वराच्या कृपेने सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर विकासात्मक कामे करता आली. गेल्या 30 वर्षापासून निस्वार्थीपणे कार्यकर्त्यांनी माझे राजकारण उभे केले. महाराष्ट्र मध्ये असे जिवाभावाचे कार्यकर्ते क्वचितच एखाद्या नेत्याला लाभले असतील त्यापैकी मी एक स्वतःला भाग्यवान समजतो तुमच्या ऋणातून मी उतराई होऊ शकत नाही यापूर्वीही कार्यकर्त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त वेळ देऊन काम करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा माझे आयुष्य माझ्या ह्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसाठी पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने आणि अधिक तत्परतेने पूर्ण वेळ देऊन काम करण्याची मी भूमिका आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो असे प्रतिपादन माजी खासदार संजय काका पाटील यांनी केले. इथून पुढे कार्यकर्ते हाच माझा पक्ष अशी भूमिका संजय काका पाटील यांनी व्यक्त केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर तासगाव कवठेमंकाळ मधील संजय काका पाटील समर्थकांनी आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात माजी खासदार संजय काका पाटील बोलत होते. यावेळी बोलताना संजय काका पाटील म्हणाले, विधान परिषद व लोकसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये मला भरीव काम करता आले. खासदार म्हणून काम करताना टेंभू ताकारी म्हैशाळ योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करता आला, सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग राज्यमार्ग जिल्हा व ग्रामीण मार्ग याकरता हजारो कोटींचा निधी उपलब्ध करता आला, रेल्वे विकास जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यावधींच्या निधी उपलब्ध करून देऊन सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच मला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही माझ्यासाठी जीवाचं रान करून अहोरात्र झटला आहात आता येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत आता माझे कर्तव्य आहे येणाऱ्या निवडणुका ह्या मी स्वतः हातात घेऊन कार्यकर्त्यांना यश प्राप्त होण्यासाठी मी अहोरात्र झटणार आहे यासाठीच आजचा संवाद मेळावा आपण आयोजित केला आहे इथून पुढचे जे माझे काही निर्णय असतील ते फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या हितासाठीचे कार्यकर्त्यांना विचारात घेऊन असतील. यावेळी बोलताना युवा नेते प्रभाकर बाबा पाटील म्हणाले, इथून पुढच्या काळात नेता म्हणून नव्हे तर तुमचा सहकारी म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याची भूमिका माझी असेल. आगामी स्थानिक सदस्य संस्थांच्या निवडणुका करता मी उपलब्ध राहणार आहे. यावेळी विलास भाऊ पाटील,प्रमोद आप्पा शेंडगे ,जनार्दन दादा पाटील ,बळी तात्या पाटील,संभाजी आण्णा खराडे,पी के पाटील,सुखदेव आबा पाटील,रमेश कोळेकर ,किशोर पाटील ,सुनील जाधव,आर डी पाटील,महेश हिंगमिरे,कुमार शेटे,महादेव आण्णा सूर्यवंशी,रणजित घाडगे,अजित माने,डॉ.प्रताप नाना पाटील,शंकर नाना मोहिते, नितीन पाटील,महेश पाटील,ऋषिकेश बिरणे,शशिकांत जमदाडे,उमेश दादा पाटील,चंद्रकांत कदम सर,बाबासो पाटील,जाफर मुजावर,अविनाश पाटील,दिग्विजय पाटील,हणमंत पाटील,किशोर गायकवाड,दत्ता रेंदाळकर,अनिल कुत्ते,नवनाथ पाटील,डॉ.ठोंबरे,चंद्रकांत लोंढे सर,विजय पाटील ,जलाल शेकडे,बंटी भोसले,ईश्वर व्हनखंडे,अजय पाटील,अजित यमगर,श्रीकृष्ण पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर,अरुण राजमाने,नितीन नवले,विक्रम भाऊ पाटील,बाळासाहेब पाटील,मनोज मुंडुगणर,डॉ अनिल कोरबू यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
