सलवा हुसेन चे स्मितहास्य

😊स्मितहास्य असलेली चित्रातील स्त्री म्हणजे सलवा हुसेन, शरीरात हृदय नसलेली स्त्री, तिच्या पिशवीत कृत्रिम हृदय ठेवणारी ही जगातील एक दुर्मिळ घटना आहे. ‘डेली मेल’ या ब्रिटीश वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की, ३९ वर्षांची सलवा ही २ मुलांची आई सुद्धा आहे. तिचे हृदय असलेली पिशवी नेहमी तिच्याजवळ असते आणि त्यात ६ किलो ८०० ग्रॅम वजनाच्या २ बॅटरी असलेले उपकरण असते…
हे इलेक्ट्रिक मॉनिटर आणि पंप आहेत. रक्ताभिसरणासाठी जोडलेल्या नळ्यांद्वारे प्लास्टिकच्या पिशवीतील हवा रुग्णाच्या छातीत नेण्यास बॅटरी मदत करते…!
तिच्या चेहऱ्यावरचे ते हास्य पाहून आपल्या सर्व चिंता आणि समस्या किती व्यवहार्य आहेत? याची जाणीव होते… म्हणूनच दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा निसर्गाने खूप काही दिलं आहे, त्याचे आभार माना… जीवनाचा आनंद घ्या आणि जमलंच तर इतरांसाठी निःस्वार्थ भावनेने जगून पहा…!🙏🏻