बेरडेवाडीत अवतरले क्रांतिकारक

जि.प.शाळेत साजरा झाला अनोखा प्रजासत्ताक दिन,

शिराळा, दि.26 जानेवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)

आज संपूर्ण भारतात 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. शिराळा तालुक्यातील बेरडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा झाला. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी थोर क्रांतिकारक महापुरुषांच्या वेशभूषेत उपस्थित झाले. यावेळी प्रत्येक महापुरुषांविषयी विध्यार्थीनी मनोगते व्यक्त केली.
ग्रामपंचायत सदस्य वनिता विनोद बेरडे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वनिता दत्तात्रय बेरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शहीद भगतसिंग , लोकमान्य टिळक, झाशीची राणी लक्ष्मीबाई, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, यांची वेषभूषा परिधान करून देशभक्तांची यशोगाथा आपल्या वक्तृत्वातुन सादर केली. तसेच देशभक्तीपर गीतावर नृत्य करून उपस्थितांच्या डोळ्यातील पारणे फेडले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले . पालकांनी शाळेच्या भौतिक सुविधेसाठी देणगी देऊन सहकार्य केले यावेळी विनोद बेरडे, कांता कंदारे, योगिता बेरडे मनोगत व्यक्त केले .यावेळी लक्ष्मण कांदारे, ज्ञानेश्वर बेरडे, अनिल सावंत, सर्जेराव बेरडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुप्रिया घोरपडे, सूत्रसंचालन उपशिक्षक जितेंद्र लोकरे यांनी केले तर आभार सहयोगी शिक्षिका सविता पाटील यांनी मानले.

महाराष्ट्र मराठी न्यूज – नथुराम कुंभार शिराळा.