आराध्या चव्हाण ला राष्ट्रीय धनुर्विद्या मध्ये सुवर्णपदक

तासगाव, दि. २६ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा)

विजयवाडा आंध्रप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा २०२३ मध्ये ९ वर्षांखालील वयोगटा मध्ये महाराष्ट्राचा दणदणीत विजय झाला तर वैयक्तीक मुली कँपौंड गटामध्ये तासगाव तालुक्यातील शिरगाव (वि.) जि.सांगली येथील आराध्या गजानन चव्हाण हिला सुवर्ण पदक मिळाले. तसेच टीम महाराष्ट्र व मिक्स टीम साठी रौप्य पदक मिळाले. तीच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून आभिनंदन होत आहे.