खुजगाव जि.प.शाळेत प्रजासत्ताकदिन उत्साहात

शिराळा, दि.27 जानेवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)

देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. शिराळा तालुक्यातील खुजगाव येथील जिल्हा परिषद शाळेत अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम करून उपस्थितांची मने जिंकली. सरपंच मंगल पोतदार यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी शाळेतील मुलांनी सादर केलेल्या देशभक्तीपर बहारदार गीतांनी मंत्रमुग्ध केले.विद्यार्थ्यांनी मानवी मनोऱ्याचे प्रात्यक्षिक अतिशय थरारक व उत्कृष्टरित्या सादर केले याचबरोबर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लेझीम खेळातुन कार्यक्रमात रंगत भरली.
या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच मंगल पोतदार, मुख्याद्यापक- संजय गुरव, सुनिल गुरव ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष – स्वाती सुतार उपाध्यक्ष माया कुंभार, नथुराम सावंत, जे वाय कुंभार, धनाजी सावंत, सहयोगी शिक्षका मेघा गुरव, तलाठी मंदार पाटील यांचेसह नागरिक पालक महिला,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार- शिराळा