तासगाव, दि. २८ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांतर्गत तासगाव येथील स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजची तपासणी झाली. तपासणी प्रक्रिया मणेराजुरी ता तासगाव येथील ‘महावीर पांडुरंग साळुंखे जुनिअर कॉलेज याच्या विशेष पथकाने केली. पथकाचे प्रमुख प्राचार्य टी. एच. चव्हाण यांचे स्वागत कॉलेजचे प्राचार्य व्ही.एच. पाटील यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड चे प्राचार्य डॉ. महेशकुमार गायकवाड, आजीव सेवक सेवक प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन ज्युनियर विभाग प्रमुख प्रा. एस. जे. पाटील व आर्ट्स/कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.आर. एम. कोळेकर, यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. के .टी.पाटील, प्रास्ताविक क्रिडाविभाग प्रमुख प्रा.संभाजी पाटील यांनी केले. तर आभार प्रा. आर.एम. कोळेकर यांनी मानले.
