श्रावणी व आदिती वडगावकर यांचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश

तासगाव, दि. २९ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा)


राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे (सारथी) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वर्षात मणेराजूरीच्या दोघी सख्या बहिणींनी घवघवीत यश मिळविले. श्रावणी प्रविण वडगावकर व आदिती प्रविण वडगावकर यांनी घवघवीत यश मिळवले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.


कै.ज्ञानोजीराव साळुंखे प्राथमिक विद्यामंदिर पाटण जि. सातारा येथील इयत्ता ३ री मधील विद्यार्थीनी श्रावणी प्रविण वडगावकर (रा.मणेराजुरी ता. तासगाव) ‘शाहू महाराज यांची आठवण ‘ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. तिला वर्गशिक्षिका पल्लवी देवके व मुख्याध्यापक गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
माने-देशमुख विद्यालय, पाटण जि.सातारा येथील इयत्ता ६ वी मधील विद्यार्थीनी आदिती प्रविण वडगावकर (रा.मणेराजुरी ता. तासगाव) हिने ‘शाहू महाराज व कृषीक्रांती’ या विषयावरील वक्तृत स्पर्धेत राज्यात सहावा क्रमांक मिळवला. तिला शोभा कदम, वर्गशिक्षिका सहीवी, सांस्कृतिक विभागप्रमुख शरद ढाणे, प्राचार्य आर. एस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही सख्या बहिणी प्राथमिक शिक्षक प्रविणराजे वडगावकर यांच्या कन्य व माजी वरिष्ठ मुख्याधापक भरत वडगावकर यांच्या नाती आहेत. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.