सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली, ठाकरे फौंडेशन व
नेचर कॉंजर्वेशन् संस्था सांगली यांचा संयुक्त उपक्रम, संरक्षक किटचे वाटप.


शिराळा, दि. ३० जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली यांच्या वतीने उखळू ता.शाहुवाडी येथे वनातील मजुरांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी वन मजुरांना प्रथमोपचार व संरक्षक किटचे वितरण करण्यात आले. हे शिबीर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि ठाकरे फौंडेशन , नेचर कॉंजर्वेशन् संस्था सांगली यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. या आरोग्य शिबिरात ११६ पुरुष व ११२ महीला असे एकुण २३८ जणांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
यावेळी ठाकरे फॉउंडेशन चे स्वप्नील पवार, नेचर कॉंजर्वेशन् संस्था सांगली चे अमोल जाधव, विभागीय वन अधिकरी गणेश पाटोळे, चांदोलीचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, वनपाल हारून गारदी, वनपाल शिवाजी पाटील, वनरक्षक उस्मान मुल्ला, सरपंच भाग्यश्री तोटफळ, ईश्वर पाटील, राजाराम मुटल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरात डॉ.पी.के.देशमुख, डॉ.काशीद खेडकर,
डॉ.श्वेता सहारे, डॉ. अरबाज चौधरी, डॉ.सैफ शेख, डॉ.विशवनाथ चौगले यांच्या वैद्यकीय पथकामार्फत मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.