श्रेया पाटील, मिनाज व्हनवाड यांची चमकदार कामगिरी


तासगाव, दि.३१ जानेवारी २०२३(महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा-प्रदीप पोतदार)
गोवा येथे झालेल्या ६ व्या राष्ट्रीय फेडरेशन कप पिंच्याक सिलेट स्पर्धेत सांगली जिल्हा फेडरेशनच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत महाराष्ट्रासाठी 2 सुवर्ण व १ कास्य पदकांची कमाई केली . स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघासाठी उपविजेते पद पटकावले. या राष्ट्रीय स्पर्धेत जिल्हा संघाच्या २ मुले व ५ मुली असे ७ खेळाडू महाराष्ट्र राज्य संघातुन सहभागी झाले होते.
स्पर्धेमध्ये ज्युनियर महिला गटात फाइट व रेगु ( सेनी इवेंट ) या प्रकारात काकडवाडी ता.मिरज च्या श्रेया पाटील हिने सुवर्ण पदक मिळवले. तर सिनियर महिला गटात कवठेएकंद ता. तासगावच्या सौ. मिनाज व्हनवाड यांनी कास्य पदक पटकावले. स्पर्धेमध्ये सांगली संघाकडून कुणाल पाटील (सावळज), आकांक्षा माळी (कवठे एकंद), समीक्षा सावंत (तासगाव), पूजा खाडे (सांगली), अभिषेक बोरगावे (कुपवाड) या खेळाडूनी सहभाग घेतला होता. यशस्वी खेळाडूंना जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष खंडेराव जाधव, उपाध्यक्ष विजय भगत, सचिव व प्रशिक्षक अमोल कदम यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये १६ राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र संघाला सांघिक उप विजेतेपद मिळाले . विजेत्या खेळाडूंना गोवा चे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राष्ट्रीय अध्यक्ष किशोरजी येवले, राष्ट्रीय महासचिव महंमद इक़बाल तसेच विविध राज्यांचे प्रतिनिधिच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.