ॲड. आर. आर. पाटील संघाची निवडणूक बिनविरोध

तासगाव, दि.३ फेब्रुवारी२०२३(महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा)

तासगाव येथील ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सहकारी खरेदी- विक्री संघाची सातवी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १७ पैकी १६ जागा बिनविरोध झाल्या तर सोसायटी गटातील एक जागा रिक्त राहिली. बिनविरोधची परंपरा या वेळीही कायम राहिली.

बिनविरोध निवडून आलेले संचालक असे सोसायटी गट- सुधाकर धोंडीराम जवळेकर (सावर्डे), दिपक धोंडीराम पाटील (अंजनी), तानाजी आनंदा पाटील (तुरची), विश्वास आनंदा पाटील (मतकुणकी), सुरेश राजाराम पाटील (आमणापूर), संदीप नानासो पाटील (बोरगांव), सर्वसाधारण गट परशराम यशवंत (पी.वाय.) जाधव (दहिवडी), राजकुमार बाबुराव जोतराव (तासगाव), रंगराव भिमराव पाटील (हातनुर), सुभाष तुकाराम पाटील (विसापूर), अमोल संपतराव पाटील (ढवळी), महिला राखीव कमल धनंजय पाटील (आरवडे), मनिषा रघुनाथ पाटील (कुमठे), अनुसचित जाती-जमाती गट- बाबासो एकनाथ अमृतसागर.

आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वखाली निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील, रोहित पाटील, ज्येष्ठ नेते शंकर पाटील, पीतांबर पाटील, हणमंतराव देसाई, रवींद्र पाटील यांनी प्रयत्न केले. निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर निवडून आलेल्या संचालकांनी आर. आर. आबा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. आमदार पाटील यांनी आर. आर. आबांनी स्थापन केलेल्या संस्थेचा कारभार तितक्याच आदर्शपणे पुढे चालवला जावा, व्यक्त केली. अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.