बाल चित्रकार ओम कुंभार चा सत्कार

तासगाव , दि. ८ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) निमणी ता.तासगाव येथील महाराष्ट्र अंनिस च्या अंकाचे ओम कुंभार या प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवनावरील शिल्प व चित्र प्रदर्शन मराठा भवन सांगली येथे नुकतेच पार पडले, यावेळी सांगली सातारा सह अनेक ठिकाणांहून अडीचशेहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला ,अंधश्रद्धा निर्मूलन याविषयावर घेण्यात आलेली चित्रकला स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील निमणी प्रशालेचा विद्यार्थी ओम कुंभार याने प्रथम क्रमांक मिळविला. तासगाव अंनिस व राष्ट्रसेवा दल शाखा तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबुराव गुरव सर यांच्या हस्ते ओम कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आपल्या अंगभूत गुण वैशिष्ट्ये जोपासली पाहीजेत आणि अभ्यासाबरोबरच ईतर गुणांना चालना दिली पाहिजे हे सांगताना आपल्या शाळेतील एक विद्यार्थी महाराष्ट्र भर आत्ता पोचणार आहे, अंनिस वार्तापत्रावर ओम कुंभार यांचे प्रथम क्रमांक मिळवलेले चित्र झापण्यात आले आहे त्यामुळे ओम कुंभार यांच्या हस्ते अंनिस वार्तापत्र चा फेब्रुवारी महीन्याच्या अंकाचे प्रकाशन होताना विशेष आनंद होत असल्याचे डॉ बाबुराव गुरव सर यांनी मत व्यक्त केले.राष्ट्रसेवा दलाच्या नुतन परीट यांनी ओम कुंभार यांचे अभिनंदन करताना आपल्या शाळेचा गौरव वाढला असल्याचे मत व्यक्त केले त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक तितकेच अभिनंदनास पात्र आहेत.तासगाव अंनिस शाखेच्या वतीने अमर खोत यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये आपल्या तालुक्यातील निमणी मधील अतिशय छोट्या गावातील ओम कुंभार यांने प्रथम क्रमांक मिळविला ही आमच्या साठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे अशी भावना व्यक्त केली. यावेळी प्रशालेचे प्राचार्य पुरुषोत्तम गुरव यांचे सहकार्य लाभले.यावेळी मा रामभाऊ गुरव प्रा वासुदेव गुरव आणि शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.