जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आरळा शाखेचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात

शिराळा, दि.12 फेब्रुवारी 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा, नथुराम कुंभार)

आरळा ता.शिराळा येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेचा ४४ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
आरळा गावच्या सरपंच बाळुबाई धामणकर, सोनवडे येथील सरपंच सोनाली नाईक, मराठेवाडीचे सरपंच – बंडु मराठे, तालुका विभागीय अधिकारी एस.बी.शेळके,
माजी सरपंच हिंदुराव नांगरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले.
यावेळी विभागीय अधिकारी बी.डी.शिंदे, व्ही.टी.नायकवडी, शाखाधिकारी एस.डी.दंडवते, आय.एल.पारधी, डाॕ.आनंद चौगुले, माजी उपसरपंच सदाजी पाटील, कॕशीयर – जी.एम.कुंभार, सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव पाटील, विलास पाटील, माजी चेअरमन बाळु नांगरे, वसंतराव येसले, बॕकेचे कर्मचारी पी.डी.वनारे, आर.एस. पाटील, विवेक नाईक, विशाल खोत, वाय.डी.कांबळे तसेच परीसरातील नागरिक उपस्थीत होते.