कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण

विविध मागण्यासाठी आंदोलन, आंदोलनाचा 22 वा दिवस, शासनाकडून अद्याप दखल नाही


राहुरी, दि.15 फेब्रुवारी 2023 (निकिता पाटील, महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा मधील कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय पूर्ववत करावा या सह इतर मागण्यासाठी गेल्या 21 दिवसापासून राहुरी कृषी विद्यापीठाच्या समोर आंदोलन चालूच आहे. शासन स्तरावर या आंदोलनाची कोणतीही दखल ण घेतल्याने आंदोलन कर्त्यांनी आता आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. आंदोलनाचा आजचा 22 वा दिवस असून साखळी उपोषणाचा 5 वा दिवस आहे.
या आंदोलनामध्ये संपूर्ण राज्यभरातून अभियांत्रिकी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली राज्य कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 व 2022 तात्काळ स्थागिती द्यावी, या स्पर्धा परीक्षा मधील कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय पूर्ववत करावा, स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे. मृद व जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थीची तात्काळ भरती प्रक्रिया रबविण्यात यावी. या सह इतर मागण्यासाठी हे आंदोलन गेल्या 21 दिवसापासून चालू आहे. आजचा आंदोलनाचा 22 वा दिवस असून अद्याप पर्यंत शासनाने या बाबत कोणताही ठोस असा निर्णय ण घेतल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. बेमुदत साखळी उपोषण गेली 5 दिवसापासून सुरु असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन असेच चालू ठेवणार असल्याचे आंदोलनकर्ते विद्यार्थी यांनी सांगितले.