तासगाव, दि.19 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अखंड हिंदुस्थानचे दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त येथील युवकांनी एकत्रित येऊन जात-पात धर्म व राजकारण विरहित रॉयल युथ फाऊंडेशनची स्थापना केली. या शिवजयंतीचे औचित्य साधून डब्बास गल्ली येथील बेलबाग येथे रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर घेऊन फाउंडेशन च्या सामाजिक कार्याचा शुभारंभ करण्यात आला. शिबिराचे उदघाटन तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणेयांच्या हस्ते झाले. यांनी सर्वप्रथम स्वतः रक्तदान करून फाउंडेशन च्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, रुग्णसेवक निसार मुल्ला, तलाठी पतंग माने, नगरसेवक संतोष बेले, दिग्विजय पाटील, रोहन पोळ, अरमान पठाण, सचिन पोळ, अशपाक पठाण, सोहेल मुलानी, स्वप्नील चव्हाण, रवी सुतार, छोटू विभुते, गुरू पाटील, संतोष सुतार, दिलावर मुजावर व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
