कवठे एकंद ला शिवजयंती उत्साहात

रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, पोवाडा विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

तासगाव, ता.19 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा ) कवठेएकंद ता. तासगाव येथील  शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांच्यावतीने ” एक गाव -एक शिवजयंती “संकल्पनेतून   शिवजयंती विविध उपक्रमातून साजरी करण्यात आली.लेझीम, हलगी ताशांचा निनादात शोभायात्रा, शिवज्योत पालखी सोहळा, जन्मकाळ सोहळा, आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर  वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांनी  शिवजयंती साजरी करण्यात आली .

जुनी चावडी येथे आकर्षक सभा मंडप उभारून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला  भजन कार्यक्रम शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. तर स्टॅन्ड चौकातून  छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक लेझीम पथकाच्या निनादात  काढण्यात आली.

      शिवजन्मोत्सव  समिती यांच्यावतीने मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची  प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी  शालेय विद्यार्थी, युवक महिला बंधू-भगिनी यांच्या उपस्थितीत   महाआरती होऊन शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने  जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर घेण्यात आले. तर दि.20 रोजी सकाळी 10  वृक्षारोपण दु.11वा. रांगोळी स्पर्धा तसेच दि.20 रोजी रात्री 9 वा. प्रसिध्द शिवशाहीर प्रसाद विभुते यांचा पोवाडा आयोजित करण्यात आला आहे. दि.21 रोजी  सकाळी 9 वा.श्वान स्पर्धा तर सायंकाळी 7 वा.भव्य मिरवणुक व लाईट शो करण्यात येणार आहे.

       मावळा प्रतिष्ठान ब्राह्मण गल्ली यांच्या वतीने  शिवजयंतीच्या निमित्ताने युवक कार्यकर्त्यांनी   पन्हाळगड येथून  गावात  शिवज्योत आणण्यात आली. शिवज्योतीचे व  पालखीचे गावामध्ये ठिकठिकाणी    मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले . ब्राह्मण गल्ली येथे शिवमूर्ती ची  प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने बेघर वसाहत परिसरात  वृक्षारोपण, दत्त मंदिर येथे रक्तदान शिबिर तसेच  दि. 22 रोजी सांस्कृतिक रेकॉर्ड डान्स स्पर्धा  आयोजित करण्यात आल्या आहेत.