तासगाव, दि.२० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ३ री आंतरराष्ट्रीय परिषद दि.२३ व २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे ‘मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन बेसिक अँड अप्लायड सायन्सेस'(एमएबीएएस २०२३ ) या विषयावर ही परिषद संपन्न होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जेष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ.अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत त्याचबरोबर कंन्सास युनिव्हर्सिटी अमेरिका येथून प्रा.उदयन आपटे , क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया येथून प्रा.दिपक डुबल ,ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी लंडन येथून प्रा.डी.उकळे ,टेक्सास युनिव्हर्सिटी अमेरिका येथून डॉ.रणजीत गुरव ,स्कूल ऑफ सायन्स मुंबई येथून प्रा.एन.एस.देसाई , औरंगाबाद विद्यापीठातून प्रा. एम.बी. मुळे ,शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के , प्र – कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , सचिवा प्राचार्य शुभांगीताई गावडे , मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे , सहसचिव प्राचार्य डॉ.आर.व्ही. शेजवळ , प्राचार्य एस.एम. गवळी , प्राचार्य डॉ.आर.आर. कुंभार , शिवाजी विद्यापीठातून प्रा.सौ.सरिता ठकार , प्रा.एच.डी. डेलेकर या परिषदेसाठीच्या नॉलेज पार्टनर प्रा.सौ.ज्योती जाधव यांची विशेष व्याख्याने व मार्गदर्शन लाभणार आहे. तासगाव मध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आत्तापर्यंत ३०० पेक्षा अधिक प्राध्यापक , संशोधक विद्यार्थी यांनी नोंदणी केली आहे.महाविद्यालयाच्या वतीने या अगोदर पाचगणी येथे दोन आंतरराष्ट्रीय परिषदा संपन्न झाल्या होत्या. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी दिली.या परिषदेची जय्यत तयारी महाविद्यालयात सुरू आहे. महाविद्यालयात विविध कमिट्या स्थापन करून कामाचे नियोजन केले आहे. संशोधक विद्यार्थ्यांना या परिषदेचा निश्चितच फायदा होणार आहे.
