सोनवडेत शिवजयंती उत्साहात साजरी

शिराळा, दि.21(नथुराम कुंभार, महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सोनवडे ता.शिराळा येथील शिवशंभो प्रतिष्टानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिम्मीत्त किल्ले पन्हाळगड येथुन शिवज्योत आणुन सोनवडे येथे तिचे पुजन करण्यात आले तसेच सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची सोनवडे गावातुन मिरवणुक काढण्यात आली यामध्ये पारंपारीक वेश परीधान करुन युवक,युवती मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी शिवशंभो प्रतिष्टानच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या सोनवडे गावातील शालेय मुला मुलिंचा शिवरायांची प्रतिमा देवुन सन्मान करण्यात आला. सोनवडे येथील शिवजयंती सोहळा यशस्वी होण्यासाठी- विजय पाटील, अदिक यादव,विक्रम पाटील, प्रथमेश पाटील, स्वप्नील नांगरे, महेश नांगरे, सूरज कुंभार, माधव पाटील, विश्वजित यादव, गणेश यादव, दिगंबर नाईक, प्रतीक कुंभार, रोहीत सुतार, अभिजीत पाटील यांचेसह शिवशंभो प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी संयोजन केले.