तासगाव, दि. २७ फेब्रुवारी २०२३ (प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
तासगाव येथील गांधले पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थी विधार्थिनीच्या आजी-आजोबांचे पाद्यपूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी ज्यांनी आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा केली आहे. अशा व्यक्तीचा गौरव समारंभ डॉ. गणेश गांधले चॅरिटेबल ट्रस्टचा मुनीश्वर आश्रम मार्फत करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे ज्योती संजय (काका) पाटील व जागतिक किर्तीचे बिझनेस कोच-वक्ते नामदेवराव जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सचिन बनूजे होते. यावेळी सुबराव नारायण नलवडे, इस्माईल राजेमहमंद मुजावर, गणपती महादेव पाटील, तानाजी पांडुरंग चव्हाण, डॉ. प्रभाकर सोनाप्पा डावरे, शिवाजी आनंदा एडके, रणजीत वसंत खरमाटे, जयसिंग रघुनाथ पाटील, विकास नारायण पाटील, महेश शंकर पवार या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
