विद्यार्थ्यांनी संतुलित व सकस आहार घ्यावा – डॉ. साहिल जमदाडे

पी.डी.व्ही.पी. महाविद्यालयात ‘जागरूक पालक सुदृढ बालक’ मोहिमेअंतर्गत आरोग्य तपासणी

तासगाव, दि.1 मार्च 2023 (प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) संतुलीत आहाराचा आपण आपल्या जेवणात समावेश नाही केलात तर आपले शरीर निरोगी व धडधाकड राहू शकनार नाही. पोषक तत्त्वांचा आहारात सामावेश असणे गरजेचे असते. संतुलित आहार घेतल्यामुळे आजारपण येत नाही . मानसिक स्वास्थ चांगले राहते त्यामुळे विद्यार्थ्यांनी संतुलित आणि सकस आहार घ्यावा असे प्रतिपादन डॉ.साहिल जमदाडे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे केले. ग्रामीण रुग्णालय तासगाव व पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘जागरूक पालक सुदृढ बालक ‘ मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणीच्या वेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले. आपल्या अन्नपदार्थात संतुलित आहार घेणे खूप गरजेचे आहे. हे त्यांनी विविध उदाहरणांच्या साहाय्याने पटवून दिले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उंची ,वजन तपासून गरज असलेल्या विद्यार्थ्यांना औषधे दिली. विद्यार्थ्यांना बेकरी प्रॉडक्ट , फास्ट फूडपासून दूर राहण्याचा मौलिक सल्ला दिला. अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा.एस.डी.पाटील यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले. प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले. यावेळी डॉ.श्वेता चौगुले ,फार्मासिस्ट पल्लवी कोळी ,परिचारिका सुप्रिया रावळ यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभागप्रमुख प्रा.के.एस.गायकवाड यांनी केले तर आभार डी.व्ही.पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला प्रा.एस.एस.सातपुते, प्रा.ए.आर.गणेशवाडे , प्रा.एस.एम.खेराडकर, प्रा.एम.एम. सूर्यवंशी, प्रा.शिवाजीराव पाटील, प्रा.सुशांत झांबरे, प्रा.रणजीत पाटील यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.