तासगाव, मंगळवार दिनांक – 17 जून 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सातारा जिल्हा पोलीस दल व पोलीस बॉईज स्पोर्ट्स क्लब यांचे मार्फत सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एस पी चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये तासगाव च्या आर आर पाटील स्पोर्टस क्लब च्या महिला टीम ने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत आर आर पाटील स्पोर्टस क्लब च्या महिला टीम ने पुणे, सातारा व नवी मुंबई या दिग्गज संघाचा मोठया फरकाने पराभव केला. साताराच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडूस्कर व शहर पोलीस उपअधीक्षक सबनीस साहेब यांचे शुभहस्ते संघाला गौरवण्यात आले. तासगाव सारख्या ग्रामीण भागात नियमित सराव करून जे यश या संघाने मिळवले त्याबद्दल सर्वच अधिकाऱ्यांनी संघातील मुलींचे कौतुक केले. कृत्रिम हिरवळीच्या मैदानावर पहिल्यांदाच या संघाने स्पर्धा खेळली. क्लबची खेळाडू कु. श्रावणी पाटील हिला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले. गेल्या तीन वर्षांमध्ये फुटबॉल मधील दबदबा या संघाने कायम राखला आहे या संघाला आमदार रोहित दादा पाटील क्लबचे अध्यक्ष सुदाम शेठ माळी प्रशिक्षक अमित पवार, बाळू माळी, राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक अभिजीत तासगावकर, बाळासाहेब सावंत व सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले.


