कलम ३७५ आर आर करंडकाचा मानकरी

रवायत ए विरासत द्वितीय तर ट्रेझर हंट तृतीय, एकांकिका स्पर्धेत १७ संघांचा सहभाग

गुरुवार, दिनांक -20 फेब्रुवारी 2025, तासगाव (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) यंदाच्या स्वर्गीय आर आर आबा पाटील स्मृती करंडकाचा मानकरी ‘कलम ३७५’ या एकांकिका साठी परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर हा संघ झाला आहे. तर द्वितीय ‘रवायत ए विरासत’ विश्वस्त मुक्ताई फाउंडेशन, पुणे तर तृतीय ‘ट्रेझर हंट’ अखिल भारतीय नाट्य परिषद, सांगलीच्या एकांकिकेने बाजी मारली. या करंडकासाठी राज्यभरातील १७ संघानी सहभाग घेतला. स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त कै.आर आर आबा करंडक २०२५ चे आयोजन १५ व १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. आर आर पाटील स्पोर्टस क्लब व नभांत नाट्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रथम क्रमांक २१००१ हजार एक द्वितीय क्रमांक १५००१ तर तृतीय क्रमांक ११००१ असे बक्षीस ठेवण्यात आले होते. राज्यभरातील १७ संघानी यात सहभाग घेतला. समाजातील विविध गोष्टींवर या एकांकिका स्पर्धेतून प्रकाशझोत टाकण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे यशोधन गडकरी, तर परीक्षक शशांक लिमये व प्रथमेश सावंत यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी संगम माने, सुदाम माळी, अमित पवार, अमेय काळे, पियुष मिर्लेकर, चैतन्य हंचनाळकर, किरण हंचनाळकर, अथर्व खरे, अभिजीत जोशी, ओमकार वजरीणकर, श्रीकुमार माळी, सोमनाथ पवार, श्रीनिवास कुलकर्णी, आरजू मुल्ला, गायत्री नांदवडेकर, सम्मेद कुदळे, अंकित स्वामी, रेवा खाडिलकर, अनिकेत पाटील यांनी काम पाहिले. वैयक्तिक बक्षिसे:यासाठी उत्कृष्ट अभिनय पुरुष रवायत ए विरासत, मुकुल ढेकळे, उत्कृष्ट अभिनय स्त्री कलम ३७५, रमा घोलकर, उत्कृष्ट लेखक, कलम ३७५ गंधार जोग, उत्कृष्ट दिग्दर्शक कलम ३७५ वैष्णवी पोतदार ,उत्कृष्ट प्रकाश योजनाकार रवायत ए विरासत आकांक्षा पन्हाळे, उत्कृष्ट नेपथ्यकार स.न.वि.वि कीर्ती सुतार, उत्कृष्ट ध्वनी संयोजन कलम ३७५ गणाधीश मोरे, उत्कृष्ट वेशभूषाकार ट्रेझर हंट श्रुती दांडेकर असे आहेत.