कवठेएकंदच्या शोभेच्या दारूच्या स्फोटातील जखमींची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली रुग्णालयात भेट

जखमींची विचारपूस करून कुटूंबियांना व नातेवाईकांना दिला धीर

सोमवार दिनांक – 29 सप्टेंबर 2025 सांगली (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) विजयादशमी दसरा पालखी सोहळ्याच्या निमित्ताने कवठेएकंद ता. तासगाव येथे होणाऱ्या पारंपरिक शोभेच्या दारूच्या तयारी मध्ये कामकरताना स्पोर्ट होऊन एका मंडळातील आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. यामध्ये एक 16 वर्षाचा अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी सांगली येथील डॉ.अविनाश पाटील हॉस्पिटल व सिनर्जी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज दोन्ही रुग्णालयात भेट देऊन जखमीची विचारपूस केली. जखमी रूग्ण तसेच त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांना यांना धीर दिला. पुढील उपचारासंदर्भात वैध्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कवठेएकंद येथे काल सकाळी सुतार गल्ली येथील एका मंडळाचे कार्यकर्ते शोभेच्या दारूच्या कामात व्यस्त होते. त्यावेळी अचानक दारूचा स्फ़ोट होऊन त्यामध्ये आनंद नारायण यादव (55 वर्षे), गजानन शिवाजी यादव (29 वर्षे), अंकुश शामराव दोडके (29 वर्षे), प्रणव रवींद्र आराध्ये (21 वर्षे), ओमकार रवींद्र सुतार (29 वर्षे), सौरभ सुहास कुलकर्णी (27 वर्षे), विवेक आनंदराव पाटील (38 वर्षे) व आशुतोष बाळासाहेब पाटील (16 वर्षे) असे आठजण जखमी झाले. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर असून इतर सात जणांची प्रकृती स्थिर आहे. विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी ग्रामदैवत सिद्धराज्याच्या पालखी समोर होणाऱ्या पारंपरिक शोभेच्या आतषबाजीसाठी कवठेएकंद ‘महाराष्ट्राची शिवकाशी’ म्हणून प्रसिद्ध आहे. पण अश्या घटनामुळे या पारंपरिक उत्सवाला गालबोट लागत आहे. चुकीच्या पद्धतीने फटाके बनविताना योग्य ती खबरदारी न घेतल्याने अशा घटना घडतं आहेत. याकडे प्रशासनाने योग्य वेळी लक्ष घालावेत आणि बळी जाणाऱ्या निष्पापांचे जीव वाचावेत अशी मागणी होत आहे.