महिला दिनाच्या नमित्ताने आयोजन
तासगाव, दिनांक 12 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) झुआरी फार्म हब लिमिटेड जय किसान जंक्शन तासगाव यांच्यावतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त तासगाव तालुक्यातील पुनदी येथे आयोजित आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी, मोफत डोळे तपासणी व मोफत औषध उपचार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ.संतोष पाटील, डॉ. ज्योती पाटील, सरपंच शुभांगी पाटील, उपसरपंच रवींद्र पाटील झुआरी चे मॅनेजर जोतिबा जाधव उपस्थित होते. जोतिबा जाधव यांनी जय किसान जंक्शन मार्फत शेतकऱ्यांना कोणत्या सोयी सुविधा पुरविल्या जातात व जय किसान जंक्शन कशासाठी निर्माण केले की जेणेकरून चांगल्या दर्जाची खते औषधे एका ठिकाणी मिळावेत तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांच्या पिकाला योग्य तो सल्ला मिळावा असे सांगितले तसेच आपल्या कंपनीच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कधी कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. डॉ. संतोष पाटील यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले. आजच्या युगात स्त्री ही कोणापेक्षा कमी नाही कोणत्या क्षेत्रात मागे नाही तसेच आपण सर्वांनी त्यांना योग्य तो मान दिला पाहिजे व त्यांचा आदर केला पाहिजे असे सांगितले. या शिबिरामध्ये डोळे तपासणी व आरोग्य तपासणीचे एकूण 110 रुग्णांनी लाभ घेतला व त्यांना मोफत औषधे देण्यात आली तसेच प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर व अनुराधा हॉस्पिटल सांगली या हॉस्पिटलचे डॉक्टर व त्यांचा सर्व स्टाफ यांनी आरोग्य तपासणी केली. या शिबिरामध्ये पुणदी गावातील शेतकरी व महिलांनी लाभ घेतला.

