थेट नगराध्यक्ष पदासाठी विद्या सागर चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल, 12 प्रभागातील सर्व 24 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल
तासगाव, सोमवार दिनांक – 17 नोव्हेंबर 2025 तासगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने थेट नगराध्यक्ष पदासाठी अपेक्षेप्रमाणे विद्यासागर चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर पक्षाच्यावतीने 12 प्रभागातून 24 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे. थेट नगराध्यक्ष – सर्वसाधारण महिलांसाठी विद्या सागर चव्हाण, प्रभाग एक मध्ये सर्वसाधारण साठी गजानन आनंदराव माळी तर सर्वसाधारण महिलासाठी स्वाती अरुण निकम. प्रभाग दोन मध्ये सर्वसाधारण साठी विकास किसान धनवडे तर इतर मागास वर्ग महिला साठी संगीता संभाजी माळी, प्रभाग तीन मध्ये सर्वसाधारण साठी प्रवीण राजेश जाधव तर इतर मागास वर्ग महिला साठी नंदा संजय चव्हाण, प्रभाग चार मध्ये इतर मागासाठी सुशांत मोहन गायकवाड तर सर्वसाधारण महिलासाठी देविका राजेंद्र दुर्ग, प्रभाग पाच मध्ये सर्वसाधारण साठी पवनकुमार बाळासाहेब शिंदे तर इतर मागास महिलासाठी अश्विनी संतोष माळी, प्रभाग सहा मध्ये इतर मागास महिलांसाठी अर्चना सचिन माळी तर सर्वसाधारण साठी इरफान रज्जाक सय्यद, प्रभाग सात मध्ये साधारणसाठी प्रसन्न प्रभाकर गोसावी तर सर्वसाधारण महिलासाठी शिल्पा योगेश खैरमोडे, प्रभाग आठ मध्ये इतर मागासवर्गासाठी सुभाष वसंत अष्टेकर तर सर्वसाधारण महिलासाठी माधुरी उत्तम सावंत, प्रभाग नऊ मध्ये इतर मागासाठी सूरज स. गावडे तर सर्वसाधारण महिलांसाठी कोमल अमितकुमार पवार, प्रभाग दहा मध्ये सर्वसाधारण साठी विशाल महादेव पाटील तर सर्वसाधारण महिलासाठी सुरेखा महादेव बंडगर, प्रभाग अकरा मध्ये अनुसूचित जाती वर्गासाठी शिवाजी आबा गुळवे तर सर्वसाधारण महिलासाठी शीतल अवधूत साळुंखे, प्रभाग बारा मध्ये अलका सपतराव कांबळे यांनी तर सर्वसाधारण गटातून सागर गणपती बाबर यांनी अर्ज आज दाखल केले. माजी खासदार संजय काका पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी सोडल्यानंतरच्या या निवडणुकीत प्रथमच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पूर्ण क्षमतेने ही निवडणूक कमळ चिन्हावर लढण्याचे ठरवले आहे.
