पत्रकार दत्तात्रय सपकाळ यांना मातृशोक

कडेगाव, सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज) सौ.शांताबाई महादेव सपकाळ (वय- ७६) यांचे रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. यशवंतराव चव्हाण सोसायटीचे माजी उपाध्यक्ष महादेव सपकाळ यांच्या पत्नी तर देवराष्ट्रे ता. कडेगाव येथील दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार दत्तात्रय सपकाळ व दिगंबर सपकाळ यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता देवराष्ट्रे येथे होणार आहे.