तासगाव – बुधवार, दिनांक 26 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या सब जुनिअर राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत येथील क्रांती फौंडेशनचा खेळाडू पियुष सचिन बाबर याने 14 वर्ष वयोगटात लांब उडी मध्ये तृतीय क्रमांक मिळवला. त्यास फाउंडेशनचे प्रशिक्षक विकास सूर्यवंशी, बाळासाहेब माळी, सतीश सोनावणे त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
