आमदार रोहित पाटील यांना धक्का, तासगाव नगरपालिका थेट नगराध्यक्ष पदासाठी जोती अजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
तासगाव, सोमवार दिनांक – 17 नोव्हेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव नगरपरिषद निवडणूकीत आमदार रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नते आणि स्व.आर आर आबांचे कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट नगराध्यक्ष पदासाठी अजय पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ प्रतापनाना पाटील, तासगाव तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्या उपस्थित प्रवेश केला. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील, अविनाश पाटील, दीपक पाटील, ज्येष्ठ नेते दादासाहेब गावडे, विनोद पाटील, शरद रेंदाळकर, अमोल हुलवाने, अभिजीत पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.अजय पाटील यावेळी अजय पाटील म्हणाले, मी ज्या कुटुंबासोबत 30 वर्षे एकनिष्ठ राहिलो त्यांनीच विश्वासघात केला. निष्ठावंत व प्रामाणिक उमेदवारापेक्षा 50 – 60 लाख रुपये खर्च करणारा उमेदवार त्यांना हवा होता. आम्हाला अर्ज भरण्यास सांगून आज दुपारी 1 वाजता अचानक डावलण्यात आले आबा कुटुंबाकडून ही अपेक्षा नव्हती आर आर आबांच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता आमदार रोहित पाटील यांना चालत नाही. त्यामुळे आर आर आबांचा खरा विचार ज्या पक्षांमध्ये चालतो तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आहे. त्यामुळे आता आम्ही आबांचे घड्याळ हातात घातले आहे. वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तासगाव तालुका अध्यक्ष सचिन पाटील, सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव, आर डी पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
