तासगाव, गुरुवार दिनांक – 13 नोव्हेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव येथील बेदाणा कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष, संचालक राजेंद्र सदाशिव चव्हाण यांची गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक दुय्यम निबंधक सहकारी संस्था रंजना बारहाते यांनी याबाबत घोषणा केली. संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या प्रगतीसाठी काम करू. सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिक काम करू, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली. राजेंद्र चव्हाण यांनी बेदाणा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष असताना बेदाणा कामगार विमा, वारणीमध्ये वाढ यासह कामगार हिताचे अनेक निर्णय घेतले. सोबत तासगाव शहरातील स्वराज्य फाऊंडेशन या क्रीडा संस्थेच्या संचालक पदी काम करत असताना खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांची गणेश नागरी पतसंस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तर पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळी यांच्यासह सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले.
