रविंद्र वसंत पाटील यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड

तासगाव, सोमवार दिनांक – 21 एप्रिल 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील पुनदी या गावातील ग्रामपातळीवर उल्लेखनीय कार्य करणारे रविंद्र वसंत पाटील यांची “राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघ” या देशव्यापी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड ही ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकशाही मूल्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते. त्यांच्या नियुक्तीने महाराष्ट्रातील गावपातळीवर कार्यरत सरपंच आणि ग्रामपंचायतींच्या प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे. त्यांच्या या निवडीच्या निमित्ताने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ठाकुर चंदन सिंग (बिहार), राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदित्य उपाध्याय (छत्तीसगड), राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके (महाराष्ट्र), अरुण शर्मा (जम्मू-काश्मीर), सचिव रविंद्र यादव (उत्तर प्रदेश), महासचिव मुकेश सकीया (गुजरात), महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद पांडुरंग सांगोले, कोअर कमिटी सदस्य प्रेम साहू (छत्तीसगड), प्रवक्ते जयराम गौरव, महेंद्र यादव (झारखंड), अर्पिता पांडा (उडिसा), ईश्वर साहू (छत्तीसगड), गोवा प्रभारी पद्माकर मलीक, सुबत्ता सामंत, महाराष्ट्र प्रभारी सुनिल पाटील (जळगाव), सेवक नागवंशी, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. सुनिता सुतार, महिला कार्याध्यक्षा सौ. जयश्री वंजारी, मंगेश तायडे, राजकुमार मेश्राम, लक्ष्मण करारे, डॉ. शंकर ठाकरे (अमरावती), नागपूर विभागीय अध्यक्ष लक्ष्मण करारे व सुशिल रामटेके (नागपूर) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रविंद्र वसंत पाटील यांच्या या निवडीबद्दल पुणदी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, ग्रामविकासाच्या कार्यात त्यांनी अधिक व्यापक पातळीवर कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.