विसापूर जिल्हा परिषद गटातून दाखल केला उमेदवारी अर्ज
तासगाव, मंगळवार दिनांक – 20 जानेवारी 2026 ( महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती, जिल्हा परिषद माजी सदस्य व माजी पक्ष प्रतोद सुनील पाटील यांनी विसापूर जिल्हा परिषद गटातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखालील सांगली जिल्हा स्वाभिमानी विकास आघाडीतून असे दोन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले.
