तासगाव, सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने सध्याला संपूर्ण राज्यभरामध्ये सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे या अभियानाच्या अनुषंगाने विविध विधानसभा मतदारसंघांना वेगवेगळी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते आज अखेर 61 हजार 600 पूर्ण झाली आहेत विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेली असून आज तासगाव कवठेमंकाळ चे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे . सांगली जिल्ह्यात सांगली शहर व ग्रामीण असे दोन संघटनात्मक जिल्हे आहेत या मध्ये एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणारा तासगाव कवठेमंकाळ हा पहिला मतदार संघ ठरला आहे संपूर्ण राज्यात पाच जानेवारीपासून मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी सुरू झालेली होती .तासगाव कवठेमंकाळ मध्ये सदर सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ हा गणपती मंदिर तासगाव येथून झाला आहे प्रदेश व जिल्हा आणि मंडल अशा स्तरावर काम करणाऱ्या विविध पदाधिकाऱ्यांचं सुकानू समिती स्थापन करण्यात आली होती एक बुतला 200 सदस्य अशाप्रमाणे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते तासगाव शहर व कवठेमंकाळ शहर यांच्यासाठी विशेष योजना बनवण्यात आल्या होत्या याशिवाय आठवडा बाजार / यात्रा अशा ठिकाणी देखील या नोंदणी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते विशेषतः विचार परिवारातील स्वयंसेवक शिवप्रतिष्ठांचे कार्यकर्ते व भाजपच्या भाजपमधील अनेक जुन्या विचारांचे देखील कार्यकर्ते एकूण सदस्यता नोंदणी मध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आलेला आहे लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना मोफत वीज पंपाचे वीज बिल यामुळं शेतकरी वर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला होता भाजपाच्या वतीने सप्रेम भेट म्हणून शेतकरी दैनंदिन देखील अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाटप झालेले आहे विविध समाजातील घटक प्रगतशील शेतकरी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गणमान्य व्यक्ती याशिवाय व्यापारी उद्योजक वकील डॉक्टर्स इंजिनियर्स यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे कवठेमंकाळ तालुक्यामध्ये विशेषतः डोंगराळ भागात देखील कवठेमंकाळ मधील भाजप पदाधिकाऱ्यांनी तळागाळामध्ये जाऊन ही सदस्यता नोंदणी पार पाडलेली आहे 1000 सदस्यता नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे सदर 28 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब व कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचे अभिनंदन पत्र मिळालेले आहे याशिवाय 250 पेक्षा जास्त सदस्यता नोंदणी ही 100 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी पूर्ण केलेली आहे एकूणच तासगाव कवठेमंकाळ भाजपमध्ये सध्या चैतन्याचे वातावरण असून सदस्यता नोंदणी ला प्रतिसाद पाहता पश्चिम महाराष्ट्र संघटन महा मंत्री मकरंद देशपांडे,सांगली ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष दीपक बाबा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. दोन्ही तालुक्यात समिती मध्ये संदिप गिद्दे पाटील, मिलिंद कोरे, स्वप्निल पाटील, उदय भोसले, महेश पाटील, गोविंद सूर्यवंशी, अनिल लोंढे, प्रशांत कुलकर्णी व रविंद्र गाडवे यांनी काम पाहिले.
