सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार

शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटात केला प्रवेश – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत पार पडला प्रवेश सोहळा

प्रदीप माने पाटील, अरुण खरमाटे, विशाल शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला केला अखेरचा जय महाराष्ट्र

गुरुवार, दिनांक – 20 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सांगली जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले. पक्षाचे तासगाव तालुकाप्रमुख तथा सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने पाटील, महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण खरमाटे, तासगाव शहरप्रमुख विशाल शिंदे, तालुका संघटक दत्तात्रय चवदार, पैलवान संजय माने, तानाजी पाटील, प्रताप माने पाटील, सांगली जिल्हा संपर्क संघटिका ज्योतीताई दांडेकर, जिल्हा संघटिका आशाताई पोतदार, तालुका संघटिका छायाताई पाटील, उपजिल्हा संघटिका फाल्गुनीताई शिंदे यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघांचे आमदार सुहास बाबर, जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी सर्व पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.