सर्वसामान्य जनतेचा आवाज जिल्हा परिषदेत पोहचवण्यासाठी माझी उमेदवारी – प्रदीप माने पाटील

मणेराजुरी जिल्हा परिषद गटातून दाखल केला उमेदवारी अर्ज

तासगाव, मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मणेराजुरी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेचा आवाज जिल्हा परिषदेत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष प्रदीप माने पाटील यांनी महाराष्ट्र मराठी न्यूजला दिली. निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी सविता लष्करे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वंजारीवाडी गावचे सरपंच अरुण खरमाटे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.