ॲड.कृष्णा पाटील यांच्या “कोर्टाच्या पायरीवरून” पुस्तकाचे २१ फेब्रुवारी रोजी तासगावात प्रकाशन

तासगाव, सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशित प्रकाशन पूर्व पाच हजार पुस्तकाची आवृत्ती संपलेल्या सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कायदेतज्ञ ॲड. कृष्णा पाटील लिखित “कोर्टाच्या पायरीवरून” या महत्वपूर्ण संवेदनशील ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. हॉटेल जाई एक्झाॅटीका, शिवईश्वर प्लाझा, विटा रोड, तासगाव, जि. सांगली या ठिकाणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोव्याचे माजी चेअरमन अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांच्या हस्ते होणार असून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोव्याचे सदस्य अ‍ॅड. अण्णाराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रकाशक आणि कार्यक्रमाचे निमंत्रक अनिल म्हमाने व लेखक ॲड कृष्णा पाटील यांनी दिली. यावेळी तासगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित जी. शिंदे, उपाध्यक्ष ॲड. सुखदेव कोरटे, सचिव ॲड. अतुल जाधव, निमंत्रक सुधीर नलवडे, अ‍ॅड. करुणा विमल, अ‍ॅड. सायली पाटील, अ‍ॅड. प्रविण पाटील, अ‍ॅड. संकेत पाटील, रोहित पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. ए. पी. कुलकर्णी असणार आहेत. तर यावेळी ॲड. जी. के. शिंदे, ॲड. जयंत व्ही. चिपाडे, ॲड. सचिन एस. गुजर, ॲड. गजानन व्ही. खुजट, ॲड. तुकाराम आर. कुंभार, ॲड. सुनील जी. महामुनी, ॲड. एम. ए. मुजावर, ॲड. संजय बी. पाटील, ॲड. उमेद एन. बोथरा, ॲड. शैलेंद्र आर. हिंगमिरे, ॲड. दिनकर ज. माने, ॲड. भरत एन. शाळगावकर यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. यावेळी पंच्याहत्तरी पुर्ण केल्याबद्दल ॲड. ए. पी. कुलकर्णी, ॲड. सी. एम. गोसावी, ॲड. एम. पी. शिंदे, ॲड. विष्णू दाईंगडे यांचा विशेष कार्यगौरव केला जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तासगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित जी. शिंदे, उपाध्यक्ष ॲड. सुखदेव बी. कोरटे, सचिव ॲड. अतुल वि. जाधव हे असून यावेळी ॲड. जी. डी. पाटील, ॲड. मिलिंद व्ही. झेंडे, ॲड. संजय आर. घारे, ॲड. अविनाश एल. शिंदे, ॲड. दीपक पी. जोशी, ॲड. विनायक ए. पाटील, ॲड. जालिंदर एस. भोसले, ॲड. बाबासो बी. जाधव, ॲड. श्रुती एस. खरे, ॲड. सुखदेव बी. कोरटे, ॲड. संगीता एस. परदेशी, ॲड. बाबासाहेब बी. पाटील, ॲड. सुरेश एम. पाटील, ॲड. अंबरीश पी. साठे, ॲड. संजय बी. सावंत, ॲड. योगेश जे. शेंडगे, ॲड. योजना एम. देशमुख, ॲड. सुजाता एस. अडसूळ, ॲड. अनिल एस. माने, ॲड. कविता विलास कांबळे, ॲड. सुवर्णा अनंतराव देसाई, ॲड. पृथ्वीराज शिंदे, ॲड. सिध्दार्थ काकडे, ॲड. बाळासाहेब अंकलीकर, ॲड. तानाजी जाधव आदी मान्यवर वकिलांचा भारत सरकार पुरस्कृत नोटरीयन झाल्याबद्दल यांचा तर ॲड. मनोज बागल, ॲड. भाग्यश्री बेडगे, ॲड. प्रदीप पाटोळे, ॲड. दिपाली कोलप यांचा सरकारी वकील झाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अ‍ॅड. शोभा चाळके, अ‍ॅड. भारती पाटील, सुधीर नलवडे, अ‍ॅड. अधिक चाळके, अ‍ॅड. सायली पाटील, अ‍ॅड. प्रविण पाटील, अ‍ॅड. करुणा विमल, अ‍ॅड. संकेत पाटील, रोहित पाटील, अ‍ॅड. अवधुत सुतार, अ‍ॅड. माधुरी सुतार यांनी केले आहे.