अंजनीत निर्मळ स्थळी आर. आर. आबांना अभिवादन

तासगांव, दि.16 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणदिनी अंजनी.ता तासगाव येथील समाधी असलेल्या निर्मळ स्थळी विनम्र अभिवादन करण्यात आले. आई भागिरथी, पत्नी तथा आमदार सुमनताई पाटील, कन्या डॉ. सुप्रिया, मुलगा रोहित, बंधू राजाराम, सुरेश, बहिणी रंजना, सुमन, कुटूंबातील सदस्य राहुल, प्रियांका, दीपा, जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह विविध पक्षांचे नेत्यांसह मान्यवरांनी समाधीस्थळी येऊन अभिवादन केले.
खानापूर – आटपाडीचे आमदार अनिल बाबर, हेमंत बाबर, ज्येष्ठनेते शंकर दादा पाटील, हणमंतराव देसाई, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, ताजुद्दीन तांबोळी, सतिश पवार, संजय पाटील, गोपीनाथ देसाई, संभाजी पाटील, कमल पाटील, तहसिलदार रविंद्र रांजणे, गट विकास अधिकारी अविनाश मोहिते, नियोजन समितीचे माजी सदस्य रविंद्र पाटील, तासगावच्या कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ मस्के, विवेक शेंडगे, सावळजच्या सरपंच स्वाती पोळ, रमेश कांबळे, डोंगरसोनीचे उपसरपंच किशोर कोडग, प्रकाश पाटील, रोहित कलढोणे, दिपक उनउने, लक्ष्मण कोळी, अभिजित पाटील, दत्ता पवार, इंद्रजित चव्हाण, संजय पाटील, अलंकार निकम यांनी आबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
ॲड आर. आर. पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन संदीप पाटील, सुनील माळी, माजी चेअरमन अमोल पाटील, स्वामी रामानंद भारती सूतगिरणीचे चेअरमन पतंग माने, सिदगोंडा पाटील, बाळासाहेब पाटील, रामभाऊ थोरात, युवकचे दत्ता हावळे, आबांचे स्विय सहायक पी. एल कांबळे, अमोल शिंदे, जे. के. पाटील, ॲड. संजय सावंत, ॲड. गजानन खुजट, संग्राम पाटील, ओंकार शेटे, पंकज अमृतसागर, अक्षय धाबुगडे, शरद रेंदाळकर, अजय डिसले, विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
कवठेमहांकाळ तालुक्यातील महांकाली उद्योग समूहाच्या अध्यक्षा अनिताताई सगरे, चंद्रशेखर सगरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील, कार्याध्यक्ष महेश पवार, दादासाहेब कोळेकर, चंद्रकांत हाक्के, सुरेखाताई कोळेकर, गणेश पाटील, महेश पाटील, दिग्विजय शिंदे, नचिकेत पाटील, सागर जगताप, सत्यजित साळुंखे, अजित शिंदे, अक्षय पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आबांच्या समाधीचे दर्शन घेतले.