अंनिस चा आधारस्तंभ पुरस्कार अमर खोत यांना प्रदान

तासगाव, दिनांक -19 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शतकवीर आणि आधारस्तंभ ‘कार्यकर्त्याचा सन्मान सोहळा ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर जिल्हा रायगड येथे पार पडला. तासगाव अंनिस शाखेचे कार्याध्यक्ष अमर खोत यांना समितीचे क्रियाशील कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या आजवरच्या जडणघडणीत सक्रीय सहभागा विषयी आणि मासिकाच्या वाढीसाठी नेहमी प्रयत्नशील असल्या बद्दल या कार्याची दखल घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा “आधारस्तंभ कार्यकर्ता”हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी हा पुरस्कार नीरजा, मुंबई (सुप्रसिद्ध कवयित्री) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष -भाऊ सावंत, रायगड अंनिस चे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमुख पाहुणे -साहित्यिक राजीव तांबे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती मध्ये राजीव देशपांडे, मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण, राहुल थोरात (अंनिवा संपादक मंडळ) आणि प्रा.वासुदेव गुरव उपस्थित होते.