अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे अवाहन

शिराळा, गुरुवार दि.6 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार, शिराळा) अग्रणी साहित्य प्रतिष्ठान,देशिंग-हरोली ता.कवठेमहंकाळ जि.सांगली या प्रतिष्ठानच्या वतीने अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात आली असुन अग्रणी पुरस्काराचे हे २१ वे वर्ष आहे. दरवर्षी विविध साहित्यिक कलाकृतींसाठी हे पुरस्कार दिले जातात यावर्षी अग्रणी उत्कृष्ठ समग्र वाड्.मय पुरस्कार, अग्रणी उत्कृष्ठ काव्यसंग्रह पुरस्कार, अग्रणी उत्कृष्ठ कथासंग्रह पुरस्कार, अग्रणी उत्कृष्ठ युवा वाड्.मय पुरस्कार या चार प्रकारांमध्ये एक उत्कृष्ठ व एक विशेष असे दोन पुरस्कार दिले जातील. तसेच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल एका साहित्यिकास अग्रणी साहित्य साधना पुरस्कार दिला जाणार आहे. यावर्षीच्या पुरस्कारासाठी १५ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकाच्या २प्रती, लेखकपरिचय व १ फोटो दि. ३० आॕगस्ट २०२३ अखेर पुढील पत्यावर पाठवावेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुस्तक, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. पुरस्कार पोस्टाने पाठवला जाणार नाही. पुरस्कारांचे वितरण नोव्हेंबर २०२३ मध्ये संपन्न होणाऱ्या २१ व्या अग्रणी साहित्य संमेलनामध्ये केले जाईल. असे आवाहन अग्रणी साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कवी दयासागर बन्ने व संचालक यांनी केले आहे. सदर पुस्तके कवयित्री सौ.मनीषा पाटील – कार्यवाह, अग्रणी साहित्य प्रतिष्ठान, देशिंग हरोली, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली, पिन कोड – ४१६४१४ या पत्यावर पाठविण्याचे अवाहन करण्यात आले आहे