अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या – सुमित कदम

कोल्हापूर, दि.11 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्रांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनीकेली आहे. याबाबत चे मागणीचे निवेदन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले आहे.
कदम यांनी निवेदनात म्हटले आहे, एप्रिल महिन्यात राज्यातील काही ठिकाणी वादळी व वळीव स्वरुपाच्या पावसामुळे फळ बागायतदार व शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. बाधित शेतीचे तत्काळ पंचनामे करुन संबंधित शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई द्यावी.